
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दि. १५ जून २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षा (SET) ला येत्या १५ ऑगस्टला दोन महिने पूर्ण होणार असूनही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे निकालाचा नेमका मुहुर्त कोणता, असा प्रश्न आता उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.
विद्यापीठातील SET परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाचा नोडल विभाग असून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही पात्रता परीक्षा घेतो. जून महिन्यात SET आणि NET दोन्ही परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. छएढ परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असताना डएढ परीक्षेचा निकाल मात्र अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्यात होणार्या विलंबाचे नेमके कारण काय, अशी विचारणा परीक्षार्थीनी केली आहे.
www.konkantoday.com




