
चिपळूण येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत तायक्वांदो अकॅडमी राजापूरच्या विद्यार्थ्यांचे यश
राजापूर : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आणि शहानुर चिपळूण तालुका तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २३वी सब -जुनियर व जुनियर ८वी कॅडेट तसेच २३ वी सिनियर क्यूरोगी व पुमसे स्पर्धा २ ते ४ ऑगस्ट दरम्यान स्वामी मंगल कार्यालय चिपळूण येथे झाली. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातील खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील २५ खेळाडूंनी राजापूरचे प्रतिनिधित्व करत १५ सुवर्ण पदक, ५ रौप्य पदक, ४ कांस्य पदकाची कमाई केली. याचबरोबर गत ८ वर्षांची परंपरा कायम राखत यावर्षीही राजापूर तालुक्यातील ३ खेळाडू बेस्ट फायटरचे मानकरी ठरले.
यामध्ये यज्ञेश जगदीश पेणकर हा सब-जुनियर गटात, रिया मुकेश मयेकर ही जुनियर गटात, तर पूर्वा संदीप राऊत हिने सिनियर गटात हा ‘किताब पटकावला.
विविध गटात झालेल्या या स्पर्धेत श्वेत मुकेश नाचरे, यज्ञेश जगदीश पेणकर, युवराज मंदार पेणकर, वेदांत नरेश रहाटे, द्रोण संदीप चव्हाण, मिताली मोहन घुमे, शुभ्रा विवेक गुरव, आयुष संतोष बावकर, श्रीपाद दीपक गवंडी,
रिया मुकेश मयेकर, गार्गी संजय बाकाळकर, पूर्वा संदीप राऊत आणि गौरव दीपक धालावलकर यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. नक्ष परुशुराम पवार, आदित्य अभिजित तेली, वैष्णवी विजय पाटील (२ रौप्य) आणि अंश राजन गुंडये यांनी रौप्यपदक, तर मृदुला मोहन घुमे हिने कांस्यपदकाची कमाई केली.
नियमित पुमसे प्रकारात रिचा संजय मांडवकर हिने वरिष्ठ गटात सुवर्ण पदक पटकावले, तर गार्गी संजय बाकळकर हिने फ्री स्टाईल पूमसे या प्रकारात सुवर्णपदक पटकावले. काव्या प्रसाद शिवलकर हिने फ्री स्टाईल पूमसे प्रकारात कांस्य पदक पटकावले. निहाल नितीन आंबेरकर, हृदया नवनीत शिंदे, दार्शी मंदार भोसले, तिथी दादा झेंडे, वेदिका नरेश रहाटे, रुद्र दादा झेंडे या खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत राजापूर हायस्कूल, नॅशनल इंग्लिश स्कूल रानतळे, आरएसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल आंबेवाडी, विश्वनाथ विद्यालय, गोखले कन्याशाळा व इमेन्स पब्लिक स्कूल या प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. विजेत्या खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, संचालक संजय सुर्वे यांनी शुभेच्छा दिल्या.
तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे अध्यक्ष अभिजित जनार्दन तेली, उपाध्यक्ष मुकेश मयेकर, खजिनदार संजय मांडवकर, सदस्य दीपक धालवलकर, संदीप राऊत, प्रसाद शिवलकर, सौ. मानसी दिवटे, सौ. दीपिका पवार, अद्वैत अभ्यंकर, निलेश रहाटे यांनी सुद्धा सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व खेळाडूंना राजापूर तालुकाप्रमुख प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे व सौ. मधुरा नाचरे यांच्यासह प्रशिक्षक अंश गुंडये, गौरव धालवलकर हे मार्गदर्शन करत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रुतिका संजय मांडवकर, हितेंद्र तानाजी सकपाळ व आकाश योगेंद्र बरई यांना पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली.