बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंत संध्याकाळ पासून सकाळपर्यंत पोलीस व वनखात्याची पथक व गाड्या पावस ते गावखडी रस्त्यावर तैनात करा भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन.

पावस – गावखडी या रस्त्यावर बिबट्या नागरिकांना लक्ष करीत असल्याच्या घटना घडत आहेत. या हल्ल्यामुळे त्या परिसरातील नागरिक तसेच रस्त्यावरून जा-ये करणारे प्रवासी भयभीत आहेत. त्या बिबट्याचा बंदोबस्त तात्काळ करणे आवश्यक आहे. याबाबत बिबट्या संरक्षित प्राणी प्रकारात येत असल्याने अनेक तांत्रिक बाबींचा अंतर्भाव असल्याने या संदर्भात कारवाईसाठी वेळ लागू शकतो. मात्र होणारी दिरंगाई ही नागरिकांच्या जिवावर बेतणारी ठरते. या रस्त्यावर वनविभाग व पोलीस यांची संयुक्त पथके व पेट्रोलिंग व्हॅन सायंकाळी ६ ते पहाटे ७ पर्यंत नियुक्त करण्यात यावीत काळोख झाल्यानंतर प्रवाशांना एकत्र करून टप्प्या टप्प्याने पेट्रोलिंग व्हॅन सह सोडण्यात यावे. तसेच या रस्त्यावर प्रखर लाईटची व्यवस्था तात्काळ करावी. अशी कळकळीची मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. या मागणीच्या प्रती मा. वनमंत्री, मा. पालकमंत्री, मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा आमदार रत्नागिरी तसेच पोलिस निरीक्षक रत्नागिरी यांना पाठवण्यात आल्याचे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले. नागरिकांच्या संरक्षणाचे दृष्टीने तात्काळ उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा ॲड. दीपक पटवर्धन भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केली. गणेशगुळे – कुर्धे, जांभुळआडी या भागातून आलेली माहिती व दूरध्वनी या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button