
चिपळूणची ग्रॅव्हिटी पाणी योजना काहीशी अडचणीत
तब्बल २१ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मंजुरी मिळालेली आणि प्रत्यक्षात कामाला सुरूवात झालेली चिपळूणची ग्रॅव्हिटी पाणी योजना काहीशी अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी १५५ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी असताना आतापर्यंत शासनाकडून केवळ ४ कोटींचाच निधी प्राप्त झाल्यने सुरू असलेली कामे रखडण्याची दाट शक्यता आहे. सध्या पेढांबे ते पिंपळी दरम्यान चार किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्यातच साठवण टान्यांची कामेही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे पुढील कामांना चालना मिळण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.www.konkantoday.com