
लांजा आराखड्याबाबत रविंद्र चव्हाण यांनी केली स्थगितीची मागणी
लांजा नगर पंचायतीच्या प्रारुप विकास आराखड्यावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध नोंदवण्यात येत असतानाच आता या प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन आराखड्याला तातडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
लांजा विकास आराखड्याला स्थगिती मिळावी, यासाठी लांजा कुवे येथील नागरिकांच्यावतीने गठीत करण्यात आलेल्या लांजा-कुवे बचाव समितीने काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विकास आराखड्याला स्थगिती मिळावी, याबाबत पत्र दिले होते. या संदर्भात चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले असून लांजा-कुवे येथील जनतेच्या मागणीनुसार आराखड्याला स्थगिती मिळावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले आहे की, लांजा नगर पंचायतीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या प्रारुप विकास आराखड्यात अनेक त्रुटी असून हा आराखडा वस्तुस्थितीचा योग्य अभ्यास न करता तयार करण्यात आला आहे. शासनाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या ’टंडन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने फक्त गुगल मॅपच्या आधारे आराखडा तयार केला असून प्रत्यक्ष पाहणी न करता शहराचा भविष्यातील विकास आराखड्यात मांडण्यात आला आहे. त्यामुळे या विकास आराखड्याला तातडीने स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.www.konkantoday.com