
पटवर्धन हायस्कूलमध्ये गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात.

रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे आज (९ ऑगस्ट) गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. गणेश मूर्तिकार श्रीकांत ढालकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.कार्यक्रमास शाळेचे कलाशिक्षक व उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर आणि पर्यवेक्षक अमर लवंदे उपस्थित होते. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यातील सर्जनशीलता खुलून आली.स्पर्धेत प्रथम क्रमांक सुजय माने, द्वितीय क्रमांक गौरी धुमक आणि तृतीय क्रमांक मंथन आंब्रे यांनी मिळवला. याशिवाय तीन उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आली.या उपक्रमाचे आयोजन पाचवीचे कला शिक्षक श्री. धामापूरकर यांनी केले होते. संपूर्ण कार्यक्रम आनंदी व सर्जनशील वातावरणात पार पडला.