अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ!

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेरीनंतर राबविण्यात येत असलेल्या ‘ओेपन टू ऑल’ या फेरींतर्गत ८ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास अंतिम मुदत होती. मात्र राज्य सरकारने नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनाची सुटी जाहीर केल्याने या फेरीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली होती. या फेरीसाठी प्राधन्यक्रम अंतिम केलेल्या ३ लाख ८१ हजार ४२० विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ४८ हजार ७८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधन्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागा उपलब्ध केल्या आहेत. ८ ऑगस्टपर्यंत या फेरीअंतर्गत ३ लाख १५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यातील नियमित फेरीमध्ये ३ लाख १० हजार ७०८ इतके प्रवेश झाले आहेत. तसेच कोटामध्ये ४ लाख ६०३ इतके प्रवेश झाले आहेत.

मात्र ८ ऑगस्ट रोजी मुंबई विभागात नारळी पोर्णिमेनिमित्त सुटी असल्याने, तसेच ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ११ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ पर्यंत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button