
दिव्यांगांसाठी निधी खर्च करणारी चिपळूण नगरपालिका आघाडीवर
दिव्यांगांसाठी गेल्या दोन वर्षांत एक कोटी वीस लाख रुपये निधी खर्च करणारी चिपळूण नगरपालिका जिल्ह्यात आघाडीची ठरली आहे.
दिव्यांगांसाठी चिपळूण नगर परिषदेचा पाच टक्के राखीव असून नगराध्यक्षा सौ.सुरेखा खेराडे यांनी दिव्यांगांसाठी निधी खर्च करण्यासाठी जातीने लक्ष घातले. गेल्या दोन वर्षांत १९६जणांना जीवनाश्यक साहित्याचे वाटप या निधीमधून करण्यात आले त्यामध्ये मोटारसायकल पासून लॅपटॉप,घरघंटी, झेरॉक्स,मशिन, व्यवसायासाठी आवश्यक असणारे साहित्य पुरवण्यात आले.चिपळूण नगरपालिकेने दिव्यांगांसाठी उचललेल्या पावलांबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com