
चिपळूण शहरात डीबीजे कॉलेजसमोर महामार्गावर सिमेंट ब्लॉक नेणारा ट्रक उलटला
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालयासमोर सिमेंट ब्लॉक नेणारा टक सर्व्हिस रोडवर उलटल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही, मात्र, यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ कोलमडली. क्रेनच्या सहाव्याने हा ट्रक महामार्गावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
या ट्रकमधील सिमेंट ब्लॉक हॉटेल शालोम लगत सुरु बांधकामा ठिकाणी उतरवले जाणार होते. त्यासाठी चालकाने ट्रक हॉटेल शालोमपासून मागे घेत महामार्गावरच्या गटारावरून या ट्रकचे चाक जाताच गटाराचा काही भाग कोसळला. यामुळे टक उलटला. रहदारीच्या मुख्य सर्व्हिस रोडवर हा ट्रक उलटल्याने वाहतूक कोलमडली. हा मार्गिकवरील वाहतूक बंद करून दुसर्या मार्गिकवरून वळवण्यात आली.www.konkantoday.com