मराठा मंदिर, अ. के.देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी सौ. अंजली संतोष पिलणकर यांची नियुक्ती

       रत्नागिरी येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी शाळेतील विद्यार्थीप्रिय इंग्रजी विषय शिक्षिका सौ. अंजली संतोष पिलणकर यांची  मराठा मंदिर  संस्थेने नियुक्ती केली आहे. या नियुक्तीच्या निमित्ताने मराठा मंदिर संस्थेचे सर्व सन्मा.पदाधिकारी श्री.विलासराव  देशमुख (उपाध्यक्ष, मराठा मंदिर मुंबई), श्री.योगेश पवार (अध्यक्ष, विद्यावर्धिनी, मराठा मंदिर मुंबई), श्री.मनोहर साळवी (सचिव, विद्यावर्धिनी,मराठा मंदिर ,मुंबई) ,श्री.संतोष नलावडे (उपाध्यक्ष, विद्यावर्धिनी, मराठा मंदिर,मुंबई) यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

   शुक्रवार दिनांक ०१/०८/२०२५ रोजी सौ.अंजली संतोष पिलणकर यांनी प्रशालेच्या मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारला. यानिमित्ताने शाळेमध्ये पदग्रहण व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. अत्यंत उत्साहात विद्यार्थी , माजी विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी त्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
      सौ.अंजली पिलणकर यांचे शालेय शिक्षण मराठा मंदिर, अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी या शाळेतच झाले आहे . त्यांचा इंग्रजी विषयाचा अध्यापन अनुभव २७ वर्षे इतका असून त्यांनी तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. विविध उपक्रम व शिबिरे आयोजित करून एस.एस.सी.बोर्डाचा इंग्रजी विषयाचा १०० % निकाल लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांना २०१४-१५ यावर्षी माध्यमिक शिक्षण विभाग,जि. प. रत्नागिरी यांनी आदर्श महाराष्ट्र छात्र सेना शिक्षक पुरस्कार, २०२१-२२ या वर्षी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट मुंबई यांचा राज्य उत्कृष्ठ गाईडर पुरस्कार जाहीर, २०२४-२५ या वर्षी लायन्स क्लब रत्नागिरी यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार व रोटरी क्लब रत्नागिरी यांनी नेशन बिल्डर पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविले आहे. स्काऊट- गाईडच्या विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्या १४ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. अध्यापनासह त्यांनी निबंध स्पर्धा, काव्य लेखन, काव्य वाचन, गीतगायन, समाजसेवा इत्यादी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. टी. डी. एफ. शिक्षक संघटनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
      पदग्रहण व स्वागत समारंभ कार्यक्रमास  प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीम.दळी पी.डी. व श्री. शेखर , मराठा मंदिर,स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे, मराठा मंदिर, न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री. करे के. टी. व स्टाफ, र. न.प.शाळा क्र. १३ मधील शिक्षक श्री.विशाल, चव्हाण, श्री.सुधीर करमरकर, सौ. खेडस्कर, कोंकण विभाग व रत्नागिरी जिल्हा टी. डी. एफ. चे अध्यक्ष श्री.सागर पाटील व शहर कार्याध्यक्ष श्री.रमेश ढोले, शहर संघटक श्री.दिनेश नाचणकर, मेस्त्री हायस्कूल रत्नागिरी च्या मुख्याध्यापिका व रत्नागिरी माध्यमिक पतपेढीच्या शाखा संचालिका सौ. मुनव्वर तांबोळी, GJC 95 गोल्डन फॅमिली ग्रुपचे सदस्य व शिवसेनेचे रत्नागिरी शहर प्रमुख श्री.बिपीन बंदरकर व सदस्य, टाकळेवाडी गावच्या माजी उपसरपंच सौ. सुचिता पिलणकर, देसाई हायस्कूल च्या माजी पर्यवेक्षिका सौ. शैलजा लिमये, माजी शिक्षिका सौ. मंगल पाटील, माजी ग्रंथपाल सौ.मेश्राम, शिर्के हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.सी. एस.पाटील, योग शिक्षिका सौ. ज्योती गावंड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. शबाना होडेकर, श्री. रणजित सुवारे, या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून सौ.पिलणकर याचे शाल-पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
   मुख्याध्यापक पदी विराजमान होणाऱ्या सौ.पिलणकर यांचा त्यांच्या सर्व कुटुंबियांमार्फत या कार्यक्रमास उपस्थित राहून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गार्डी एस.एस.यांनी केले व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.मिरगल एस.टी. यांनी आभार मानून समारोप केला. शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button