चिपळूणच्या प्रियांका चव्हाणने वजीर सुळका केला सर


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील भोम खालचीवाडीची सुकन्या प्रियांका चंद्रकांत चव्हाण हिने गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर करत बेटी पढाओ, बेटी बचाओचा संदेश दिला. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर बेटी पढाओ, बेटी बचाओ हा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील प्र्रियांका चव्हाण हिच्यासह तिचे सहकारी सहभागी झाले होते. अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी वजीर सुळका आहे. ९० अंशातील ३०० फूट उंच भला मोठा सुळका चढाईसाठी अत्यंत अवघड मानला जातो. हा सुळका सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button