
काँग्रेसच्या रत्नागिरी प्रभारी तालुकाअध्यक्ष पदी प्रसाद उपळेकर
रत्नागिरी : जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदावर नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आल्यानंतर आता रत्नागिरी तालुका अध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून प्रसाद उपळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्याला नुकतेच दोन नूतन जिल्हाध्यक्ष मिळाल्या नंतर आता रत्नागिरी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी प्रसाद उपळेकर यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसाद उपळेकर हे पंचवीस वर्षाहून अधिक काळ काँग्रेस बरोबर असून सक्रिय राजकारणात आहेत. काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ही संधी मिळाल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड होताच सर्व पदाधिकारी यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. मुंबईतील टिळक भवनात घेण्यात आलेल्या मुलाखतीनंतर निवड समितीने एक मुखाने प्रसाद उपळेकर यांची नियुक्ती कायम केली आहे. त्यामुळे रत्नागिरी काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असून रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे