
आर्थिक अडचणीमुळे रत्नागिरी न.प.च्या ५५ कंत्राटी कर्मचार्यांची कपात
आर्थिक अडचणीमुळे नगर परिषदेने ५५ कंत्राटी कामगार कपातीच्या धडक आणि कठोर निर्णय घेत, मोठा धक्का दिला आहे. आगामी काळात गणपती, दसरा आणि दिवाळीसारखे महत्वाचे सण येत असताना ही कामगार कपात करण्यात आल्याने गेल्या १८ ते २० वर्षापासून कंत्राटी तत्त्वावर काम करणार्या त्या कर्मचार्यांना अश्रू अनावर झाले.
घंटागाडीवर काम करणार्या चालकांसह ५५ कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. त्या सर्वांवर आता बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे.
नगर परिषदेने ओढवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी व प्रशासनाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे. या अचानक निर्णयामुळे प्रशानातील आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा आणि उद्यान विभागातील २० टक्के कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक कर्मचारी आरोग्य विभागातील आहेत.
www.konkantoday.com