
रेल्वे प्रशासन चाकरमान्यांसाठी आणखी दोन गणपती स्पेशल सोडणार
रेल्वे प्रशासनाने आणखी दोन गणपती स्पेशल गाड्या जाहीर करत गणेशभक्तांना दिलासा दिला आहे. एलटीटी-सावंतवाडी गणपती स्पेशलसह दिवा-खेड अनारक्षित मेमू स्पेशलचा समावेश आहे. एलटीटी-सावंतवाडीचे ३ ऑगस्टपासून आरक्षणही खुले होणार आहे.
नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने गणेशभक्त प्रतीक्षा यादीवर आहेत. या चाकरमान्यांकडून जादा गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा आग्रह करण्यात आला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांच्या फेर्या जाहीर केल्या जात आहे. ०११३१/०११३२ क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी स्पेशल २८ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी धावणार आहे.
गुरूवार ते रविवार एसटीटीहून सकाळी ८.४५ वाजता सुटून त्या रात्री १० वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. परती प्रवासात गुरूवार व रविवारी धावणारी स्पेशल सावंतवाडी येथून रात्री ११.२० वाजता सुटून दुसर्या दिवशी १२.२० वाजता एलटीटीला पोहोचेल. स्पेशलला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप थांबे देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com