रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायत यांच्याकडून दर दिवशी एकूण २ कोटी ३९ लाख लिटर प्रदूषित सांडपाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते तसेच समुद्र आणि नद्यांमध्ये सोडले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहितीच्या अधिकाराखाली श्री. संजय जोशी आणि सुरेश शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली असता ही धक्कादायक बाब उघड झाली. प्रदूषित सांडपाणी प्रक्रीया न करता तसेच सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला पर्यायाने जीवाला धोका निर्माण झाल्याने हिंदु जनजागृती समितीने याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील सुराज्य अभियान उपक्रम समन्वयक संजय जोशी यांनी आज रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देली. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या नगरपरिषदांकडून दर दिवशी अनुक्रमे ८८ लाख,२० लाख, ७० लाख आणि २५ लाख लिटर सांडपाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ‘ आणि नदीत सोडले जाते; तर दापोली आणि गुहागर नगरपंचायतींकडून दर दिवशी अनुक्रमे ३० लाख आणि ६ लाख लिटर पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते.या प्रकरणी केवळ नोटीस पाठवण्या व्यतिरिक्त संबंधितांवर कारवाई करण्याबाबत प्रदूषण मंडळाकडून होत असलेली दिरंगाई प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. www.konkantoday.com