
भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर सरचिटणीस श्री. निलेश महादेव आखाडे आयोजित ऑनलाइन गणेशोत्सव सजावट स्पर्धा रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ साठी आयोजित केली असून. गेल्यावर्षी या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. साधारण 22 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.
कोकणातील सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आहे. गणेशोत्सव निमित्त कोकणामध्ये मोठी धामधूम पाहायला मिळते. अनेक चाकरमानी आपापल्या गावी घरी गणेशोत्सव निमित्त येतात. आणि अतिशय आनंदाने उत्साहाने श्री गणेशासाठी सजावट करून गणेशमूर्ती स्थापन करतात. त्यांचा उत्साह अधिक वाढावा यासाठी आम्ही या ही वर्षी गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली आहे असे निलेश आखाडे यांनी सांगितले.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 9860625740 व्हाट्सअप क्रमांकावर बाप्पाचा आणि आपल्या सजावटीचा फोटो व छोटी रील तयार करून पाठवायचे आहे. यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढले जाणार आहेत. या क्रमांकांना प्रत्येकी प्रथम क्रमांकास ३,३३३ आकर्षक सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास २,२२२ आकर्षक सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास १,१११ आकर्षक सन्मानचिन्ह. देऊन गौरवण्यात येणार आहे. ही स्पर्धा प्रभाग क्रमांक ६ साठी मर्यादित असून. शहरातील अन्य प्रभागांसाठी देखील भारतीय जनता पार्टी शहर पुरस्कृत स्पर्धा असणार आहे. प्रभाग क्र. सहा, सात मधील देखील गणेशभक्त दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात अशी माहिती निलेश आखाडे यांनी दिली आहे. मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.