
आमदार किरण सामंत यांनी आज राष्ट्रीय मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली.
लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी आज राष्ट्रीय मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली. येणाऱ्या गणपतीच्या उत्सवानिमित्ताने ही पाहणी करण्यात आली येणाऱ्या चाकरमानांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत तसेच ठेकेदार पोलीस प्रशासन यांच्या समावेत ही पाहणी करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता कुलकर्णी, कोशिक रहाटे, जे मात्राचे जीएम हलेश, संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, त्याचप्रमाणे इतर अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
