
महिला स्नेहीसाठी गाणे ग्रामपंचायतची निवड.
गाणे ग्रामपंचायतीने महिलांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. त्यानुसार गाणे ग्रामपंचायतीची महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. जिल्ह्यातून प्रथमच या एकमेव ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून या गावात वर्षभरात महिलांसाठी विविध नियोजनबद्ध उपक्रम राबवले जाणार आहेत.महिलांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी गाणे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार गावातील महिलांना बचत गटात सहभागी करून त्यांना आर्थिक साक्षरता व स्वावलंबनासाठी मदत, एनआरएलएम, मनरेगा व स्टार्टअप योजनांच्या माध्यमातून व्यवसायासाठी प्रोत्साहन, पंचायत पातळीवर लिंग समानता संसाधन केंद्र स्थापन, बाल विवाह प्रतिबंध आणि लिंग आधारित हिंसाचार विरोधात विशेष उपक्रम ग्रामपंचायतीने राबविले आहेत. महिलांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत जिल्ह्यातून प्रथमच गाणे ग्रामपंचायतीची निवड महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून करण्यात आली.www.konkantoday.com