
पत्रकार जमीर खलफे यांना कोकणरत्न पुरस्कार जाहीर
रत्नागिरी…. स्वतंत्र कोकण राज्य अभियानांतर्फे मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कोकणरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले.
रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांना आज कोकणरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे अधीकृत पत्र अध्यक्ष धनंजय कुवसेकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे यांनी जमीर खलफे यांना दिले असून मा.सुभाष राणे,दिलीप लाड तसेच संजय कोकरे यांनी जमीर खलफे यांचे अभिनंदन केले आहे.
जमीर खलफे 2017 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत, दैनिक रत्नागिरी एक्स्प्रेस या वृत्तपत्रात कार्य करीत आहेत, त्यांनी आपल्या लेखणीतून शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.जमीर खलफे हे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या सामाजिक संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा समिती चे अध्यक्ष पदी कार्यरत आहेत, संस्थेच्या माध्यमातून ते सातत्याने सामाजिक कार्य करीत आहेत.शिवाय ते मराठी पत्रकार परिषद चे तालुका सचिव, प्रसिध्दी प्रमुख पद मोठ्या जबाबदारीने सांभाळत आहेत.सैतवडे सोशल वेल्फेअर सोसायटी चे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत.
जमीर खलफे यांच्या कार्याची दखल स्वतंत्र कोकण राज्य अभियानांतर्फे घेण्यात आली आणि हा मानाचा कोकणरत्न पुरस्कार जाहीर झाला. पुरस्काराचा सोहळा शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
जमीर खलफे यांना पुरस्कार जाहीर होताच संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी, आश्रय जेष्ठ नागरिक संघटना तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सभासद, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.




