
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत20 व्या हप्त्याचे 2 ऑगस्ट रोजी वितरण
रत्नागिरी, दि. 31 ):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत 20 व्या हप्त्याचे वितरण २ ऑगस्ट २०२५ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी येथे भव्य किसान सन्मान समारोह संमेलनात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरी सेवा केंद्रावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
जिल्हा, तालुका स्तरावर विविध कृषी संशोधन केंद्रांमध्ये, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये तसेच ग्रामपंचायत स्तरावर सदर कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी व शेतकरी सहभागी होणार आहेत.
या योजनेसाठी पात्र असलेले जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 511 शेतकरी कुटुंबांना (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षांखालील अपत्ये) प्रती हप्ता 2 हजार रुपये प्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. यावर्षीच्या हप्त्याचे वितरण अंदाजे 32 कोटी 10 लाख रुपये होणार आहे. या कार्यक्रमावेळी ‘अग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत फार्मर आयडी नोंदणीची प्रक्रिया देखील केली जाणार आहे. कृषी विषयक योजनांची माहिती दिली जाणार आहेत.