
खेड शहराकडे विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या एका स्कूल बसचा ब्रेक फेल , चालकानेप्रसंगावधान दाखवत मोठा अपघात टाळला
खेडतालुक्यातील भोसते गावातून खेड शहराकडे विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या एका स्कूल बसचा ब्रेक फेल झाला. मात्र .चालकाने प्रसंगावधान दाखवत मोठा अपघात टाळला सुमारे २० ते २५ शालेय विद्यार्थ्यांचा जीव वाचल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. खेड शहरातील जगबुडी नदीच्या किनारी हा मोठा अनर्थ टळल्याने “देव तारी त्याला कोण मारी” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून निघालेली स्कूल बस खेड शहराकडे येत असताना अचानक तिचा ब्रेक फेल झाला. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तिथे मोठा उतार होता. तसेच समोरच विद्युत महामंडळाचा एक मोठा ट्रान्सफॉर्मर आणि शेजारी भोसते पूल होता. या पुलावरून दुचाकी, तीनचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते.
ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने जराही वेळ न घालवता आपले कौशल्य पणाला लावले. त्याने प्रसंगावधान दाखवत बस तात्काळ एका बाजूला वळवली आणि झाडीमध्ये अडकवली. यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बसची पुलावरून येणाऱ्या वाहनांना धडक बसली असती आणि मोठा अपघात घडला असता,
या स्कूल बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते.