
मंगळूर एक्सप्रेसमधील रेल्वे प्रवाशाची १५ लाखांचा ऐवज असलेली बॅग चोरट्याने लांबवली.
कोकण रेल्वे मार्गावरील मंगळूर एक्सप्रेस गाडीने प्रवास करणार्या प्रवाशांची १५ लाख रुपये किंमतीचा ऐवज असलेली बॅग चोरट्याने लांबवली. नारायण रामराव सरदेसाई (६१) असे या प्रवाशाचे नाव आहे. सकाळी ४.३० च्या सुमारास ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली असता सरदेसाई यांच्या झोपेचा फायदा उठवत चोरट्याने त्यांची बॅग लांबवली, अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये ४ लाख रुपये किंमतीचे कानातील जोड, २ लाख रुपये किंमतीचे हिरे असलेले मंगळसूत्र, ६० हजार किंमतीचे मंगळसूत्र, ५० हजार रुपये किंमतीची नाकातील चमकी, १ लाख रुपये किंमतीची हिर्याची अंगठी, ३ लाख रुपये किंमतीच्या बांगड्या व ३ लाख रुपये किंमतीची गळ्यातील मोहन माळ आदींसह मोबाईल ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आदींचा समावेश आहे.
सरदेसाई यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.नारायण सरदेसाई हे ३ डिसेंबर २०२४ रोजी कोकण रेल्वे मार्गावरील मंगळूर एक्सप्रेस गाडीने मुंबई ते भटकळ, कर्नाटक असा प्रवास करीत होते. ट्रेनमध्ये झोपताना त्यांनी किंमती ऐवज असलेली बॅग उशाजवळ ठेवली होती. सकाळी ४.३० च्या सुमारास ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली असता त्यांना आपल्या उशाजवळ बॅग नसल्याचे लक्षात आले.www.konkantoday.com




