
कोलाड-वेर्णा रो-रो कारसेवा नको, त्या ऐवजी विशेष गाडी चालवा -कोकण विकास समितीची मागणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर कोलाड-वेर्णा दरम्यान जाहीर करण्यात आलेली कार रो-रो सेवा रद्द करून त्याऐवजी विशेष गाडी चालवावी, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे. कार सेवा नाविन्यपूर्ण असली तरी अत्यंत गैरसोयीची आहे, ही बाब देखील निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
या मार्गाने कोलाड ते वेर्णा प्रवासास १० ते १२ तास लागतात. रो-रो सेवेमुळे रेल्वेने १२ तासाचा प्रवास आहे. मात्र ३ तासापूर्वी पोहचून गाडी नोंदणीची आवश्यकता असल्याने वेळ अजिबात वाचत नाही. शिवाय प्रति वाहन ७,८७५ रुपये आणि प्रवाशांचे स्वतंत्र भाडे हा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नाही. एका वाहनामागे फक्त ३ प्रवाशांची अट अव्यवहार्य आहे. गणेशोत्सवात कुटुंबातील ५ ते ७सदस्य एकत्र प्रवास करतात. फक्त ३ प्रवाशांना परवानगी असल्याने उर्वरित सदस्यांना स्वतंत्र प्रवासाची गरज भासणार आहे.
रो-रो कार सेवा चालवण्यासाठी लोकोपायलट, सहाय्यक, गाडी व्यवस्थापक आदींचा स्वतंत्र ताफा लागतो. हेच मनुष्य बळ आणि मार्ग वापरुन एखादी पूर्ण प्रवाशी गाडी चालवल्यास ती अधिक उपयुक्त ठरेल. आधीच व्यापलेल्या मार्गावर कार सेवेचा आणखी भार वाढणार आहे. गणेशोत्सवात कोकण मार्ग गजबजलेला आणि तणावाखालीच
माल असतो. अशावेळी वाहतुकीसाठी वेगळी गाडी चालवणे प्रवाशी गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम करणारी ठरणार आहे.
www.konkantoday.com