
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगाराच्या मृत्यू. प्रकरणी कंपनी मालकासह चौघांवर गुन्हा
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक कंपनीत झालेल्या स्फोटात समीर कृष्णा खेडेकर (४० रा. घाणेखुंट-खेड) या कामागाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत कंपनीचे मालक विनोद सराफ, व्यवस्थापक महादेव महिमान यांच्यासह सुरेंद्र जाधव, जयंत भगत (सर्व रा. विनती कॉलनी, धामणदेवी-खेड) या चौघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंपनी मालकासह व्यवस्थापकाने तसेच सुरक्षितता व्यवस्थापकाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही साधनसामुग्री व उपाययोजना न पुरवता निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.मृत समीर खेडेकर या तरुणावर शनिवारी मध्यरात्री मोबाईल बॅटर्यांच्या प्रकाशातच घाणेखुंट येथे शोकाकूळमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री ८ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ववत झाला. यामुळे अंत्यसंस्कार अंधारातच करण्याची नामुष्की ग्रामस्थांवर ओढवली.www.konkantoday.com