
पाचव्या सागरी मच्छिमार गणनेची पूर्वतयारी म्हणून सागरी मच्छिमार गणनेसाठी गावांची पडताळणी सुरू.
पाचव्या सागरी मच्छिमार गणनेची पूर्वतयारी म्हणून भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने आयसीएआर आणि केंद्रीय सागरी मत्स्य संवर्धन संस्था (सीएमएफआरआय) मार्फत देशभरातील सागरी मच्छिमार गावांची पडताळणी व भौगोलिक स्थाननिर्धारण (जिओ-रेफरेसिंग) सुरू केले आहे. ही गणना प्रधानमंत्री मत्स्य, संपदा योजनेंतर्गत राबवण्यात येत आहे. ज्यामध्ये सीएमएनआयआय ही भारतभर कार्यान्वयनासाठी प्रमुख संस्था म्हणून कार्य करीत आहे.भारताच्या समुद्रकिनार्यावरील आणि द्वीपप्रदेशांमधील सागरी मच्छिमार गावाची अद्ययावत आणि अचूक माहिती तयार करणे हा उद्देश आहे. या माहितीच्या आधारे वर्षाच्या उत्तरार्धात होणार्या घरगुती मच्छिमार गणनेचा पाया तयार केला जाणार आहे. त्या अनुषंगाने सीएनएफआयआय आणि फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया (एफएसआय) चे १०८ अधिकारी प्रत्येक सागरी मच्छिमार गावाला भेट देत आहेत.www.konkantoday.com