
कोकणात महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी रणनीती, रविंद्र चव्हाण आणि ना. उदय सामंत यांच्यात खलबतं
विधानसभेप्रमाणेच स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्येही कोकणामध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. मुंबईमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण आणि राज्याचे ×उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत चर्चा झाली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या मुंबईतील रायगड बंगल्यावर म्हणजे ना. उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये ठाणे आणि रायगड, रत्नागिरी मधील विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.www.konkantoday.com