
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
रत्नागिरी, दि. २५ : राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता रेमंड हेलिपॅड ठाणे येथे आगमन व हेलिकॉप्टरने ता. खेड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी १२.४५ वाजता जामगे सैनिक शाळा हेलिपॅड, ता. खेड येथे आगमन व मोटारीने खेड नगरपरिषदेकडे प्रयाण. दुपारी १ वाजता खेड नगरपरिषदेच्या नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या स्व. मिनाताई बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण सोहळा. (स्थळ : खेड नगरपरिषद, ता. खेड) दुपारी २ वाजता मोटारीने जामगे सैनिक शाळा हेलिपॅड, ता.खेड,जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी २.१५ वाजता जामगे सैनिक शाळा हेलिपॅड, ता.खेड येथे आगमन व हेलिकॉप्टरने रेमंड हेलिपॅड, ठाणेकडे प्रयाण.
000