कोकणात आढळून आलेल्या कातळखोद चित्रांचे महत्त्व जागतिक स्तरावर

गेल्या काही वर्षात कोकण प्रांतातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदिमानवाचा इतिहास उलगडणारी कातळ खोद चित्र अर्थात स्थानिक भाषेत ओळखली जाणारी कातळशिल्प मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. कोकणातील अश्मयुगीन कालखंडावर आणि एकूणच मानव जातीच्या कलात्मक उत्क्रांतीवर प्रकाश झोत टाकणारी ही कातळ खोद चित्र मानव जातीचा खूप मोठा वारसा ठेवा आहे. या कातळ खोद चित्रांना वैश्विक मूल्य आहे. या वारसा ठेव्याला जागतिक स्तरावर दर्जा मिळावा म्हणून भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिळून 8 व गोवा राज्यातील 1 असे एकूण नऊ गावांचा प्रस्ताव युनेस्को कडे पाठवण्यात आला होता त्यास युनेस्कोने प्राथमिक मान्यता दिली आहे. ( यादी सोबत जोडण्यात आली आहे)
महाराष्ट्र राज्याच्या आणि भारत देशाच्या दृष्टीने ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. युनेस्को कडून अंतिम मान्यता मिळण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित अंतिम प्रस्ताव बनवण्याचे काम पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी राज्य शासनातर्फे क्रिएटिव्ह फूट प्रिंट्स, दिल्ली, निसर्गयात्री संस्था रत्नागिरी, तेजस्विनी आफळे असोसिएट पुणे, व बायोम पुणे, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या वतीने या संस्थां मार्फत अंतिम प्रस्ताव बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तसेच कातळ खोद चित्रांचे पुरातत्वीय महत्त्व ओळखून सांस्कृतिक मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांनी कातळ खोद चित्र परिसर संरक्षित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 17 गावांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. (यादी सोबत जोडण्यात आली आहे.) या प्रस्तावाची विशेष बाब म्हणजे कातळ खोद चित्र ज्या जागेमध्ये आहेत त्या जागेच्या मालकांचे मालकी तत्व अबाधित ठेवून संबंधित खोद चित्र संरक्षित केली जाणार आहेत. या संरक्षणाच्या कामात नियम व अटींच्या अधीन राहून संबंधित खोद चित्रांभोवती संरक्षित भिंत खोद चित्र पाहण्यासाठी येणारे पर्यटक, अभ्यासक यांच्या सोयीसाठी एक लहानसे माहिती केंद्र तसेच काही ठिकाणी स्वच्छतागृह अशा प्राथमिक बाबींचा समावेश आहे. यासंबंधी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार लवकरच काम हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे वारसा ठेवा जतानासाठी उचललेले अत्यंत सकारात्मक असे पाऊल आहे.
आपल्या देशाचा अमूल्य वारसा ठेव्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी, त्यांचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग व सहकार्य अपेक्षित आहे.
डॉ. तेजस म. गर्गे
संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय,
महाराष्ट्र शासन
मुंबई

युनेस्को जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीत दाखल करण्यात आलेली कोंकणातील खोद चित्र ठिकाणे —
रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी तालुका – ऊक्षी, जांभरूण ( एकंदर ठिकाणे 2)
राजापूर तालुका – कशेळी, रुंढे, देविहसोळ, बारसू आणि देवाचे गोठणे ( एकंदर ठिकाणे 5)
सिंधुदुर्ग जिल्हा
मालवण तालुका – कुडोपी ( एकंदर ठिकाणे 1)
गोवा
फणसाईमाळ ( एकंदर ठिकाणे 1)

सांस्कृतिक कार्य मंत्रालय, महाराष्ट्र शासनातर्फे कातळ खोद चित्र ठिकाणे परिसर संरक्षित करण्यासाठी प्रस्तावित केलेली पहिल्या टप्यातील ठिकाणे —

भगवती नगर, चवे, देऊड, ऊक्षी, ऊक्षी (2), निवळी गावडे वाडी, कापडगाव, उमरे, कोळंबे, कशेळी, रुंढे, देविहासोळ, बारसू, गोवळ, देवाचे गोठणे, सोलगाव

पार्श्वभूमी

गेल्या काही वर्षात रत्नागिरी स्थित सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉक्टर सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 80 पेक्षा अधिक गावातून 1600 पेक्षा अधिक कातळ खोद चित्ररचना जगासमोर आल्या आहेत. या खोद चित्ररचनांचा आढळ रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पलीकडे गोवा केरळ कर्नाटक या राज्यातून देखील आहे. आजमितीस कोकणपट्टीत (दक्षिण कोंकणात) आढळून आलेल्या चित्रांची एकंदर संख्या 2000 च्या घरामध्ये गेली आहे. ही खोद चित्र जगाच्या पाठीवर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी आहेत. मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीवर प्रकाश झोत टाकणारी ही चित्र जागतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, आणि डॉक्टर सुरेंद्र ठाकूरदेसाई निसर्गयात्री संस्था यांचे कार्य शोधा पुरते मर्यादित न राहता या चित्रांचे संरक्षण संवर्धन व्हावे यासाठी ही मंडळी सदैव कार्यरत आहेत. परिणाम स्वरूप 2017 पासून महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग यांच्या साथीने व सहकार्याने या खोद चित्रांच्या संरक्षण संवर्धनाच्या कामाच्या दृष्टीने सातत्याने वाटचाल चालू आहे. या कामात डॉक्टर तेजस गर्गे संचालक पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन तसेच श्री ऋत्विज आपटे पुरातत्व शास्त्रज्ञ यांची बहुमोल मदत लाभत आहे. तसेच विविध ज्ञान शाखेतील तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने अधिक सखोल संशोधनाच्या काम अव्याहतपणे चालू आहे. याचाच एक भाग म्हणून जगभरातील विविध तज्ञ मंडळींनी देखील या खोद चित्रांना भेट दिली आहे. संशोधनाच्या कामातून उपलब्ध झालेल्या पुरावांच्या आधारे कोकणात आढळून आलेली ह्या कातळ खोद चित्र रचनांची निर्मिती मध्याश्मयुगाच्या कालखंडापासून झालेली असावी असा अंदाज आहे. जगाच्या पाठीवर विविध वैशि्टय लाभलेली कोकणातील कातळ खोद चित्ररचना एकूणच मानवी इतिहासातील खूप मोठा वारसा ठेवा आहे हे पुढे येत आहे. निसर्गायात्री संस्थेचे एकंदर चाललेले प्रयत्न त्यांना मिळालेली शासन प्रशासनाची तसेच समाजातील विविध घटकांची आणि केंद्र शासनाची साथ यांचे परिणाम स्वरूप कोकणातील कातळ खोद चित्र युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी प्राथमिक यादीत दाखल झाली आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ प्राथमिक यादीमध्ये समावेश होणे ही देखील खूप मोठी आणि गौरवाची बाब आहे यामुळे कोकणातील कातळ खोद चित्रांना पर्यायाने कोकणाला जागतिक स्तरावर एक स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा विचार करता ही एक खूप मोठी उपलब्धी कोकणाला मिळाली आहे यातून ग्रामीण पर्यटन क्षेत्राचा पर्यायाने ग्रामीण भागांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होण्यास खूप मोठा हातभार लागणार आहे.

युनेस्को चा प्रवास —

कोकणात आढळून आलेल्या कातळखोद चित्रांचे महत्त्व त्यांचे जागतिक स्तरावर वेगळेपण आणि त्यांचे वैश्विक मूल्य लक्षात आल्यावर ह्या चित्ररचनांना जागतिक स्तरावर दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू झाले. एकूण आढळलेल्या कातळ चित्रांपैकी विविध निक्षांच्या आधारे पहिल्या टप्प्यात नऊ ठिकाणे निवडण्यात आली. त्यानंतर पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांचेतर्फे सदर प्रस्ताव सांस्कृतिक कार्य मंत्रालया, महाराष्ट्र शासन यांचेसमोर मांडण्यात आला. याला सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने मंजुरी देऊन सदर प्रस्ताव केंद्र शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला. केंद्र शासनाकडून सदर प्रस्ताव स्वीकारण्यात आला. त्यानंतर भारत देशातर्फे केंद्र शासनाकडून सदर प्रस्ताव युनेस्कोला सादर करण्यात आला. कातळ खोद चित्रांचे वैश्विक मूल्य पाहून युनेस्कोच्या कमिटीने सदर प्रस्तावाला मंजुरी देऊन प्रस्तावित कातळ खोद चित्र ठिकाणांचा प्राथमिक यादीत समावेश केला व अंतिम प्रस्ताव दाखल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सदर अंतिम प्रस्ताव तयार करण्यासाठी पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांचे तर्फे विषय तज्ञ संस्थांची निवड करण्यात आली आहे. या संस्थांकडून प्रस्ताव तयार करून घेऊन केंद्र शासनामार्फत युनेस्को कडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर युनेस्कोची हेरिटेज कमिटीची प्रत्यक्ष ठिकाणी भेट होईल व अंतिम मान्यता देण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button