
इंडियन कोस्ट गार्ड कार्यालयात आंतरराष्ट्रीय न्यायाचा जागतिक दिन व पॉश ॲक्ट कायद्याबद्दल मार्गदर्शन सत्र.
रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने जागतिक आंतराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त इंडियन कोस्ट गार्ड कार्यालय येथे विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन १७ जुलै रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात पॉश ॲक्ट (कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रबंधक कायदा, २०१३) या विषयावरही सखोल माहिती देण्यात आली.कार्यक्रमाला रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, डीआयजी कमांडिंग ऑफिसर टी. एन. उपाध्याय, शैलेश गुप्ता, एग्जिकेटिव्ह ऑफिसर जे. एस. ढिल्लोन, वकिल अमित अनंत शिरगांवकर यांच्यासह कोस्ट गार्डचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच पॉश ॲक्ट २०१३ या कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ॲड. अमित अनंत शिरगांवकर यांनी देखील पॉश ॲक्ट कायद्यावर मार्गदर्शन करत महिलांच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण केली.