
वेंगुर्ले शहरातील स्वच्छतेचा देशात डंका..!देशात १५ वा क्रमांक.
सिंधुदुर्ग. – स्वच्छ शहर सर्वेक्षणात वेंगुर्ले नगर परिषदेने बाजी मारली असून कोकण विभागात पहिला राज्यात तिसरा तर देशात १५ वा क्रमांक पटकावला आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण -२०२४’मध्ये २० हजारापेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार हे यश मिळाले आहे. शहराला ‘जिएफसी’ एक स्टार व ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेने कांही वर्षापूर्वी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवून अनेक पारितोषिके मिळवली आहेत.राज्यातून, देशातून आणि विदेशातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी मंडळांनी वेंगुर्ले नगरपरिषदेचा हा प्रकल्प पाहून त्याचे कौतुकही केले आहे.