
काँग्रेसवाल्यांनी काहीही बदनामी केली तरी आमचं सरकार विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार – उदय सामंत.
आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती जागा लढवायच्या, याबाबत वरिष्ठ तीन नेते निर्णय घेतील; पण कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आणि १०० टक्के निवडून येतील, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.हरियानाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील स्थिती आगामी विधानसभेवेळी असेल, असेही सांगितले. हरियानाच्या निकालावर काँग्रेसच्या नेत्यांनी टीका करण्यासाठी कागदच्या कागद लिहून ठेवले होते; पण ते त्यांना तेथे लागलेल्या निकालाने साध्य झालेले नाही. राज्यातील महायुती सरकारबाबत काँग्रेसवाल्यांनी काहीही बदनामी केलीद्व तरी आमचं सरकार विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार असल्याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला.