
कोकण युवा प्रतिष्ठानच्या समाज रत्न पुरस्काराने श्रद्धा कळंबटे सन्मानित
कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित कोकण भूषण पुरस्कार सोहळा डोंबिवली येथील मराठा हितवर्धक मंडळाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कोकण भूषण ,कोकण कलारत्न ,कोकण क्रीडा रत्न ,कोकण साहित्यरत्न ,कोकण समाज रत्न, कोकण उद्योग रत्न ,कोकण शौर्य रत्न ,कोकण पत्रकारितारत्न ,कोकण शिक्षण रत्न आणि कोकण कृषी रत्न इत्यादी पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यातील ‘कोकण समाज रत्न ‘हा पुरस्कार रत्नागिरीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती श्रद्धा कळंबटे यांना बहाल करण्यात आला. गेली 35 वर्षे त्या सामाजिक बांधिलकी म्हणून निराधार, पीडित ,समस्याग्रस्त व्यक्तींच्या सल्ला ,समुपदेशन, मार्गदर्शन व पुनर्वसनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत नुकतीच त्यांनी हाताळलेल्या प्रकरणांची संख्या एक हजाराच्या वर गेली आहे हे कार्य त्यांनी विनामूल्य तसेच शासनाचा एकही पुरस्कार न स्वीकारता निस्वार्थीपणे केलेले आहे हे यातून सिद्ध होते आजवर त्यांना अनेक मानाचे पुरस्कार तसेच शेकडो गौरव समारंभ समाजाने बहाल केले आहेत कारण त्या शाळा ,महाविद्यालय ,महिला मंडळ तसेच गाव पातळीवर जाऊन तळागाळातील जनतेशी सुसंवाद साधतात आजवर त्यांनी असे 400 च्या वर सुसंवाद साधले आहेत या त्यांच्या अनोख्या कार्याची दखल घेऊन कोकण युवा प्रतिष्ठानने त्यांना सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह आणि शाल देऊन राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सुभाष लाड सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कळंबटे मॅडम यांचे शालेय शिक्षक श्री दिलीप कुरनूरकर सर, त्यांच्या पत्नी शिल्पाताई आणि माजी विद्यार्थी प्रतिनिधी महेश परब उपस्थित होते.