
हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने चिपळुणात साकारली मगरीची प्रतिकृती.
चिपळूण येथे पार पडलेल्या राष्ट्रीयस्तरावरील हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात २२ फूट लांब मगरीची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. ही प्रतिकृती प्लास्टिकच्या धोक्याची जाणीव करून देत आहे. येथील कलाकार संतोष केतकर यांनी देशातील पहिली हलती प्रतिमा कला येथे साकारली आहे. लवकरच ही प्रतिकृती नारायण तलाव येथे ठेवण्यात येणार असून ही मगर कायमच प्लास्टीकमुक्तीबाबत प्रबोधन करणार आहे.
संघर्ष क्रीडा मंडळाने रविवारी चला धावूया प्लास्टिकमुक्तीसाठी या शीर्षकाखाली राष्ट्रीयस्तरावरील हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. हाचा धागा पकडून कलाकार केतकर व सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे प्रमुख भाऊ काटदरे यांनी प्लास्टिकची मगरमिठी अशी संकल्पना पुढे आणून ही २२ फूट प्लास्टिक बाटल्यांची मगर साकारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मगरीची ही प्रतिकृती वरील ठिकाणी ठेवण्यात आली आहे. ही केतकर यांनी साकारली आहे.www.konkantoday.com




