
गणपती विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण येत्या २५ जुलै २०२५ पासून सुरू होणार.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गणपती विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण येत्या २५ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे.त्यामुळे गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.कुठे कराल बुकिंग?गणपती विशेष गाड्यांसाठीचे तिकीट बुकिंग सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रे, इंटरनेट आणि भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर उपलब्ध असेल. प्रवाशांनी लवकरात लवकर आपले तिकीट आरक्षित करून घ्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गणपती विशेष गाड्यांची सविस्तर माहिती:
दैनिक धावणाऱ्या विशेष गाड्या:* गाडी क्रमांक ०११५२: सावंतवाडी रोड ते मुंबई CSMT विशेष* गाडी क्रमांक ०११७२: सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक (T) विशेष* गाडी क्रमांक ०११५४: रत्नागिरी ते मुंबई CSMT विशेष* गाडी क्रमांक ०१११०४: सावंतवाडी रोड ते मुंबई CSMT विशेष* गाडी क्रमांक ०११६८: सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक (T) विशेषसाप्ताहिक धावणाऱ्या विशेष गाड्या:* गाडी क्रमांक ०११६६: मडगाव जं. ते लोकमान्य टिळक (T) विशेष* गाडी क्रमांक ०११८६: मडगाव जं. ते लोकमान्य टिळक (T) विशेष* गाडी क्रमांक ०११३०: सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक (T) विशेष* गाडी क्रमांक ०१४४६: रत्नागिरी ते पुणे जं. विशेष* गाडी क्रमांक ०१४४८: रत्नागिरी ते पुणे जं. विशेषया सर्व गाड्यांचे थांबे आणि सविस्तर वेळेपत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी कळवले आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेऊन सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.