
माचाळ येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या हुल्लड पर्यटकांविरूद्ध पाेलिसांची कारवाई.
लांजा तालुक्यातील माचाळ हे पर्यटनस्थळ दिवसेंदिवस पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असून त्यामुळे या ठिकाणावर माेठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र या ठिकाणी काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करत असल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली हाेती. त्यानंतर ग्रामपंचायतीनेही असे पर्यटक आढळल्यास कारवाई करण्यात येईल असा सुचनाफलकही लावले हाेते. मात्र तरी देखील काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार घडत आहेत. रविवारी पाेलिसांच्या पथकाने माचाळ येथे जाणाèया पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करून त्यातून मद्य नेण्यापासून राेखण्यात आले. तसेच बेशिस्त पर्यटकांवर कारवाई करण्यात आली.www.konkantoday.com