
प्रेरणा संस्थेच्या स्पेशलाईज्ड सोशल केस वर्कर प्रशिक्षणात बालविवाह कार्यशाळेचे आयोजन.
रत्नागिरी : जिल्ह्यात प्रेरणा संस्थेच्या स्पेशलाईज्ड सोशल केस वर्कर प्रशिक्षणात बालविवाह कार्यशाळा पार पडली. प्रेरणा ATC, मुंबई येथील संस्था विशेषतः बाल संरक्षणावर मुंबई आणि महाराष्ट्रभर गेली ३५ वर्ष काम करत आहे. प्रेरणाचे रत्नागिरी जिल्ह्यात स्पेशलाईंज्ड सोशल केस वर्कर प्रशिक्षण या प्रशिक्षणात जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांतील लोकांचा सहभाग असून निवडक एकूण ३३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. दहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीतील ही दुसरी कार्यशाळा १९ जुलै रोजी रत्नागिरी येथे पार पडली. या कार्यशाळेस रत्नागिरी जिल्ह्यातील बालविवाह या सामाजिक प्रश्नाची स्थिती, त्यामधील यंत्रणांचा हस्तक्षेप आणि कायदा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माननीय समृद्धी वीर तसेच परीक्षा अधिकारी प्रदीप मांडवकर हे उपस्थित होते. जिल्ह्यातील गाव पातळीवरील बाल संरक्षण समित्या ॲक्टिव्ह करणे गरजेचे आहे तसेच तिथे एसएससी डब्ल्यू मधील सामाजिक कार्यकर्ते त्या समित्यांवर सदस्य म्हणून देखील काम करण्याची गरज आहे, असे चर्चेत समोर आले. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६, बाल हक्क, भारत, महाराष्ट्र आणि रत्नागिरी येथील बालविवाह प्रमाणांचा आढावा, बालविवाहाची कारणे परिणाम व कायदेशीर प्रतिबंधात्मक उपाय यांसारख्या विषयांवर सत्र घेण्यात आली. यावेळी विवाह म्हणजे काय, समाजात विवाह बद्दल असणारे समाज गैरसमज, मुलगा आणि मुलगी यांमधील महत्त्वाचे भेद, पुरुषसत्ताक मानसिकता महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील करण्यात आली. या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरणा संस्थेच्या आशियाना प्रोजेक्ट मॅनेजर श्रीम. पूजा यादव या उपस्थित होत्या. तसेच वरिष्ठ जिल्हा समन्वयक स्वप्नील सुरासे व रत्नागिरी जिल्हा समन्वयक अश्विनी कांबळे यांनी हे उपस्थित होते.मागील आठ महिने बाल संरक्षण संबंधित शासकीय विभागांना भेटी, मनोधैर्य योजना, बाल संगोपन योजना, बालगृह- कार्य व रचना, यांसारख्या महत्वाच्या विषयांवर ऑनलाईन वेबीनार सुरूच आहे. इथून पुढे देखील इतर विभागांना भेटी दिल्या जाणार आहेत. दहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीनंतर SSCW रत्नागिरी जिल्ह्यात बाल संरक्षणावर काम करण्यास सज्ज असतील.