रेल्वे स्थानकावर लिफ्टवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोरुग्णाला वाचविले.

रत्नागिरी रेल्वे स्थानकात काल वेगळी घटना घडलीरत्नागिरी रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्ण तरुणाने लिफ्टवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच पोचलेल्या रत्नागिरी पोलीस, रेल्वे सुरक्षा दल (RPF), अग्निशमन दल आणि एका मनोरुग्ण सेवकाच्या तात्काळ आणि समन्वित प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचले.ही घटना गुरुवारी रात्री ९.४५ च्या सुमारास घडली.गुरुवारी रात्री रत्नागिरी पोलीस स्टेशनमधून एएसआय सावंत यांना रेल्वे स्थानकावरील लिफ्टवर एक तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चढल्याचा कॉल आला. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवण्याची विनंती केली. नगर परिषदेतील विचारे यांनी या विनंतीला मान देऊन तात्काळ अग्निशमन दल आणि त्यांची टीम रेल्वे स्थानकाकडे रवाना केली.दरम्यान, आरपीएफचे विधाते यांच्याशी संपर्क साधल्यावर तो तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले. यामुळे तात्काळ सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांना बोलावण्यात आले आणि त्यांनीही तातडीने रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. यावेळी आरपीएफ हेड विधाते आणि नपीआय विवेक पाटील हेही आपल्या ताफ्यासह परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज होते.

तरुणाला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. सचिन शिंदे त्या तरुणाची मनधरणी करत होते, तर शहर पोलीस निरीक्षक पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनीही त्याला समजावून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. अखेर, सचिन शिंदे यांनी धीराने तरुणाकडे हात पुढे करून त्याचा हात पकडला. याच संधीचा फायदा घेत सुहेल मुकादम यांनी वेगाने शिडीवर चढून त्या तरुणाला वरती जाऊन पकडले आणि पूर्णपणे ताब्यात घेतले.पोलीस आणि सचिन शिंदे यांनी त्या तरुणाला पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्याच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button