
संमतीशिवाय बुलेट चोरल्याच्या आरोपावरून एका विरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील मार्कंडी येथील २२ वर्षीय सर्वेश उमेश साळुंखे यांनी त्यांच्या संमतीशिवाय बुलेट चोरल्याचा आरोप करत मारुती आत्माराम मिस्त्री (वय २६, रा. नागवे, ता. चिपळूण) याच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ही घटना ४ जुलै रोजी रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास रॉयल एनफिल्ड शोरूम (सती) येथे घडली. फिर्यादी सर्वेश साळुंखे यांच्या माहितीनुसार, सुरज सुनील चव्हाण (रा. मार्ग ताम्हणे) यांनी सर्व्हिसिंगसाठी रॉयल एनफिल्ड शोरूममध्ये लावलेली बुलेट गाडी (क्र. MH 08 AW 7071) मारुती मिस्त्री याने चोरून नेली. या बुलेट गाडीची किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये आहे.
या प्रकारानंतर सर्वेश साळुंखे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर १४ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री १.५८ वाजता चिपळूण पोलिसांनी मारुती मिस्त्री याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.