
दापोलीतील आंजर्ले व केळशी समुद्र किनारी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडले, खलाशी असण्याची शक्यता
दापोलीतील आंजर्ले व केळशी समुद्र किनारी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत.
आंजर्ले येथील गणपती विसर्जन पॉईंट समुद्र किनारी सुमारे ५० वर्षे वयाचा टी-शर्ट परिधान केलेला अर्धनग्न स्थितीतील पुरुषाचा मृतदेह सापडला असून सदर मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही, तसेच
केळशी येथील बापू आळी पाठीमागे समुद्र किनारी सुमारे ५० वर्षे वयाचा टी-शर्ट परिधान केलेला अर्धनग्न स्थितीतील पुरुष मृतावस्थेत सापडला असून सदर मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही,
दोन्ही मृतदेह पुरुषांचे असून मयत हे मच्छिमार व्यावसायिक असण्याची शक्यता असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.