
अपघात होण्याची शक्यता असल्याने व रहदारी असल्याने बसस्थानकाबाहेर गतिरोधक बसवण्याची मागणी.
रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणारे मध्यवर्ती बसस्थानक लोकार्पणानंतर प्रवासीवर्गाने अक्षरशः गजबजून गेलेले असते. पण या बसस्थानकाच्या आत तसेच बाहेर जाणार्या दोन्ही गेटजवळ अपघातांची शक्यता लक्षात घेता मुख्य रस्त्यावर गतीरोधक बसवण्याची मागणी एसटी प्रशासनाच्यावतीने नगर परिषदेकडे करण्यात आली आहे.या बसस्थानकाच्या तळ माळ्यावरून शहरी तर पहिल्या माळ्यावरून मुंबई-पुण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बससेवेसाठी ग्रामीण बसस्थानक कारभार सुरू झाला आहे. व्यापारी गाळे दोन पोलीस चौक्या, दोन आरक्षण खिडक्या, दोन स्वच्छतागृहांसह विश्रांतीगृह पार्सल आणि कंट्रोल रूमची व्यवस्था अशा विविध सुविधांनीयुक्त अद्ययावत बसस्थानकामुळे प्रवाशांना ऊन-पावसाचा होणारा त्रास संपला आहे.www.konkantoday.com