
चिपळूण आगारातून बाहेर पडणार्या धावत्या एस.टीचा ड्रम आणि लायनर तुटला
सोमवारी रात्री चिपळूण आगारातून बाहेर पडणार्या एका एस.टी. बसच्या मागच्या चाकाचा ड्रम आणि ब्रेक लायनर तुटल्याची धक्कादायक घटना घडली. धावत्या एसटीमधून हे लोखंडाचे मोठे मोठे तुकडे रस्त्यावर पडल्याने नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली. सुदैवाने अपघात टळला. हा प्रकार गुहागर-कल्याण विठ्ठलवाडी एस.टी. बसच्या बाबतीत घडला.www.konkantoday.com