दापोली तालुक्यातील टाळसुरे-तेलीवाडी गैरसमजातून पती-पत्नीवर हल्ला


दापोली तालुक्यातील टाळसुरे-तेलीवाडी गैरसमजातून पती-पत्नीवर कोयेतीने वार करणाऱ्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेही घटना गुरुवार ७ सप्टेंबर रोजी दुपारी१२वा. घडली.अमोल थोरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यातजमिनीवरुन वाद सुरु आहेत. दरम्यान,गुरुवारी टाळसुरे-तेलीवाडी येथील ग्रामस्थ वाडीतील रस्याच्या दुतर्फा असलेली झाडी तोडत होते.तेव्हा अमोल थोरे याने ठेवलेल्या त्याच्या सेंट्रिंगच्या लाकडांवर वाडीतील ग्रामस्थांनी तोडलेल्या झाडांच्या फांद्या पाहून त्या फांद्या मिलिंद थोरे यानेच टाकल्याचा अमोलचा गैरसमज झाला.
या रागातूनच मिलिंद थोरेआणि त्याच्या पत्नीने तयार केलेली आंबा कलम अमोल कोयतीने तोडून नुकसान करु लागला.मिलिंद थोरेआणि त्यांची पत्नी अमोलला थांबवण्यासाठी गेले असता अमोलने मिलिंदच्या डोक्यात आणि त्याच्या पत्नीच्या उजव्या हाताच्या बोटावर मारुन दुखापत केली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button