
घेरा यशवंतगडाच्या संवर्धन कामाच्या चौकशीची मागणी -भाई जगताप.
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या निकृष्ट दुरूस्ती कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत केली आहे. दरम्यान यावर बोलताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेरा यशवंतगडाच्या कामाची रितसर चौकशी लावण्यात येईल, अशी ग्वाही देखिल यावेळी दिली. राजापूर तालुक्यातील साखरीनाटे ग्रामपंचायत हद्दीतील घेरा यशवंतगडच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामाला आठ कोटी १९ लाख रुपयाचा निधी मंजूर असून घेरा यशवंतगडाच्या सवर्धन कामाच्या चौकशीची मागणी मागील दिड वर्षापासून किल्ला डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसात किल्ल्याच्या दर्शनी भागातील नव्याने बांधलेली तटबंदी कोसळल्याने राजापूर तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे. किल्ला दुरूस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रेमींतून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर घेरा यशवंतगड किल्ल्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेत या निकृष्ट कामाची तत्काळ चौकशी करण्यात यावी, अशी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मागणी केली.www.konkantoday.com