
कुवारबाव येथे चव्हाण दाम्पत्याने विहिरीत उडी मारली
कुवारबाव येथे आज सकाळी एका दाम्पत्याने विहिरीत उडी मारण्याचा प्रकार घडला होता. त्या दाम्पत्याचे नाव चव्हाण असे आहे. यातील पतीचे नाव पी.जी. चव्हाण असे असून एसटीत वाहक म्हणून काम करीत होते. नुकतीच त्यानी रिटायरमेंट घेतली होती.एसटीच्या कडून फंड व अन्य प्रकरणात त्यांनी कोल्हापुरातील लेबर कोर्टात केस दाखल केली होती असे कळते. त्यांच्या पत्नीचे नाव सरिता असून हे दाम्पत्य आज सकाळी ७च्या सुमारास माने इंटरनॅशनल स्कूलच्या जवळ फिरण्यासाठी गेले होते. तेथे जवळच असलेल्या खोल विहिरीत त्यांनी उडी मारली.विहीरीत जास्त पाणी नव्हते त्यामुळे उडी मारल्याने पी.जी चव्हाण जखमी होऊन मयत झाले. चव्हाण यांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. त्यांचे कुवारबाव येथे चप्पलचे दुकान असल्याचेही कळते. हा अपघाताचा प्रकार आहे की आत्महत्येचा आहे याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.
www.konkantoday.com