
गणपतीपुळे मंदिरात लवकरच ड्रेसकोड लागू होणार
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात देवदर्शनासाठी येणार्या भक्त व पर्यटकांना भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून देवदर्शन घेता यावे, याकरिता लवकरच ड्रेसकोड लागू करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे सरपंच श्रीराम केळकर यांनी दिली आहे.तसेच सध्या ड्रेसकोडबाबत भक्त पर्यटकांमध्ये प्रबोधन व्हावे याकरिता मंदिर परिसरात देवस्थान समितीकडून प्रबोधनपर माहिती फलक लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी सध्या भक्त व पर्यटकांना मंदिरात दर्शन घेण्याच्या दृष्टीने भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून दर्शन घेता यावे यासाठी ड्रेस कोड लागू केले आहेत.गणपतीपुळे येथील गणपती मंदिरातदेखील भक्त व पर्यटकांना भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून देवदर्शन घेता यावे याकरिता आम्हीदेखील ड्रेस कोड लागू करण्याच्या विचारात आहोत.