
राजापूर एसटी डेपोवरील जंक्शनच्या वादामुळे महामार्गाचे काम रेंगाळले
राजापूर तालुक्यातील वाटूळ ते पन्हळे या सुमारे ३७ किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून दुतर्फा वाहतूकही सुरू आहे. मात्र राजापूर शहर हद्दीतील एसटी डेपोसमोर भुयारी मार्ग की जंक्शन हा प्रश्न न सुटल्याने येथील रस्त्याचे काम द्यापही जैसे थे आहे.या ठिकाणी भुयारी मार्ग करावा की जंक्शन करावे यावरून स्थानिकांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यामुळे येथील रस्त्याचे काम रखडले असून सध्या या ठिकाणाहून कोणीही कोणत्याही दिशेने वाहनचालकासाठी भुलभुलैया ठरत आहे. सुदैवाने आतापर्यंत या ठिकाणी मोठा अपघात घडला नसला तरी तशी शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे प्रशासनाने याबाबत ठाम निर्णय घेवून येथील रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे. www.konkantoday.com




