
राजापूर शहरात घरफोडी, सुमारे १२ लाख ८० हजाराचा ऐवज लंपास.
राजापूर शहरातील लॅविश अपार्टमेंट या निवासी संकुलात दिवसाढवळया घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे.शनिवारी ५ जुन रोजी सायंकाळी ही घरफोडी झाली असुन यामध्ये चोरटयांनी सुमारे १२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहीती राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अमित यादव यानी दिली आहे.गेल्या दोन दिवसापासुन आषाडी एकादशी व मोहरम एकत्र आल्यामुळे राजापूर शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त असतानाच ही धाडसी घरफोडी झाली आहे.राजापूर आठवडा बाजारातील फळ विक्रेते श्री. भांबुद्रे यांच्या मालकीच्या प्लॉटमध्ये शिरून अज्ञान चोरटयांनी डल्ला मारला आहे. गेले अनेक वर्षे ते या ठिकाणी राहतात. सायंकाळी पती, पत्नी व मुले बाहेर गेली असल्याची संधी साधुन अज्ञाताने या प्लॅटच्या दरवाजा फोडून आत प्रवेश केला.