
चिपळूण शहरात कुत्र्यांची नसबंदी करूनही संख्या होईना कमी
चिपळूण शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी नगर परिषद दरवर्षी प्रयत्न करीत आहे. गेल्या ३ वर्षात १ हजार ५०० कुत्रांची नसबंदी झाली असून त्यावर सुमारे ३० लाख रुपये खर्च झाला आहे. यामुळे पिल्लांची संख्या कमी झाली असली तरी मोठी कुत्री वाढताना दिसत आहेत. या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. त्यामुळे ती येतात कुठून असा प्रश्न उभा ठाकला असुन प्रशासन याचा शोध घेणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शहरात भटक्या कुत्र्यांसह उनाड गुरे, गाढवे यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरे व गाढवांमुळे अनेक अपघात होत असून यात अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे. त्यामुळे गाढवांच्या मालकांना गाढवे आवरा अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगर परिषदेने काही महिन्यापूर्वी दिल्यानंतर गाढांची संख्या काहीशी कमी झाली आहे. मात्र गुरांसह भटक्या कुत्र्यांचा त्रास आजही कायम आहे.
www.konkantoday.com




