
नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन मात्र यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी पाणी जात आहे वाया
राज्यात सध्या उष्म्याची मोठी लाट असून त्यामुळे अनेक ठिकाणी आगामी काळात पाणीटंचाई होणार असल्याचे दिसत आहे त्यामुळे अनेक धरणातील पाण्याचा साठाही कमी झाला आहे रत्नागिरी नगर परिषदेने सध्या दर सोमवारी पाणीपुरवठा बंद केला आहे मात्र रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी नव्या नळ पाईप योजनेच्या पाण्याचे पाईप फुटत असून त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी वाया जात आहे सध्या साळवी स्टॉप च्या पुढे जे के फाइल्स परिसरात रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम जलदगतीने सुरु आहे. परंतु महामार्गाचे काम सुरु असताना ठेकेदारांचा हलगर्जीपणा ठिकठिकाणी दिसून येत आहे. सध्या पाणीटंचाईचा कालावधी सुरु आहे. अशा स्थितीत साळवीस्टॉप येथे रस्त्याच्या मध्यभागी जलवाहिनी फुटून लाखों लीटर पाणी वाया गेल्याचे दिसून येत आहे