
गुरे वाहतूक करणारे दोघे ताब्यात
चिपळूण रामपूरहून गुरांची खरेदी करून ती कुंभार्ली घाट मार्गे पाटण तालुक्यातील पिंपोलोशी येथे नेणार्या दोघांना अलोरे शिरगाव पोलिसांनी कुंभार्ली घाटात पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज इलाई सय्यद व मुस्तकीन दस्तगिर शेख (पिंपोलोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
www.konkantoday.com